इनऑर्बिट वाशी नोव्हेंबरभर मनोरंजनाची मेजवानी आणि ब्लॅक फ्रायडे बॅश

Nov 19, 2025 - 14:50
Nov 19, 2025 - 14:53
 0
इनऑर्बिट वाशी नोव्हेंबरभर मनोरंजनाची मेजवानी आणि ब्लॅक फ्रायडे बॅश
इनऑर्बिट वाशी नोव्हेंबरभर मनोरंजनाची मेजवानी आणि ब्लॅक फ्रायडे बॅश



वाशी : इनऑर्बिट मॉल वाशी नोव्हेंबर महिन्याला उत्साहाने सजवत आहे. महिनाभर चालणाऱ्या आकर्षक कार्यक्रमांपासून ते वर्कशॉप्स आणि अप्रतिम परफॉर्मन्सपर्यंत—प्रत्येक भेट देणाऱ्याला आनंद देणारी ही खास मेजवानी आहे.

या महिन्याचा प्रमुख आकर्षण म्हणून १५ नोव्हेंबर रोजी ‘इनऑर्बिट ज्युनियर फॅशन फेस्ट’चे आयोजन करण्यात आले आहे. बीबा, अझोर्ते, शॉपर्स स्टॉप, बिग लिटल पीपल, पर्पल युनायटेड किड्स आणि पेपे जीन्स यांसारख्या ब्रँड्सच्या उत्सवी कलेक्शनमध्ये लहान मुलांचा रॅम्पवॉक पाहायला मिळणार आहे. लोकप्रिय मॉम-ब्लॉगर्सही या कार्यक्रमात सहभागी होऊन आकर्षक आणि गोंडस फॅशन मोमेंट्स सादर करणार आहेत.

उत्सवी वातावरण अधिक रंगतदार करण्यासाठी मॉलमध्ये ‘एंटरटेनमेंट एव्हरीडे’ उपक्रम ३० नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. यामध्ये मॅजिक शो, मास्कॉट इंटरऍक्शन, लाईव्ह हार्प परफॉर्मन्सेस, क्रिएटिव्ह ग्राफिटी-टू-ऑब्जेक्ट आणि टॅटू वर्कशॉप्स, ‘कॅनव्हास ऑफ लव्ह’ आणि ‘गोल्डन वेव्ह्स’सारखी आर्ट शोकेसेस तसेच ‘पोर डिसिशन्स’च्या सहकार्याने साकारलेला मजेदार 'गेम हेवन' झोन यांचा समावेश आहे.

खरेदीदारांसाठी ब्लॅक फ्रायडे ‘शॉप अँड विन’ सेलही आकर्षण ठरणार आहे. विविध ब्रँड्सच्या आकर्षक ऑफर्स आणि रिवॉर्ड्समुळे खरेदीचा अनुभव अधिकच रोमांचक होणार आहे.

खरेदी, खेळ किंवा उत्सवी वातावरणाचा आनंद—कशासाठीही आला असाल, इनऑर्बिट मॉल वाशी येथे नोव्हेंबर महिना आठवणी, आनंद आणि स्टाईलने उजळून निघणारा ठरणार आहे.

NR Team नेशन रिपब्लिक ही एक भारतीय वृत्त माध्यम प्रकाशन वेबसाइट आहे जी मनोरंजन, क्रीडा, आरोग्य, राष्ट्रीय, राजकारण आणि बरेच काही यासारख्या विविध डोमेनवरील ताज्या बातम्या आणि अद्यतने प्रदान करते.