झोडियाक लिनन बद्दल,
लिनन हे कापड विणकामात वापरल्या जाणार्या सर्वात जुन्या तंतूंपैकी एक आहे.फ्लॅक्स प्लांटच्या देठापासून विणलेले लिनन हे जगातील सर्वांत मजबूत नैसर्गिक फायबर म्हणून ओळखले जाते. लिनन फॅब्रिकमध्ये हवा मुक्तपणे फिरू शकते व त्यामुळे उन्हाळ्यात वापरण्यास एक आदर्श वस्त्र आहे.
झोडियाक हे फ्रान्सच्या नॉर्मंडी प्रदेशात उगवलेल्या फ्लॅक्स पासून विणलेल्या व जगातील सर्वोत्तम दर्जाच्या लिननचा वापर करते. स्थानिक फ्लॅक्स उत्पादकांना आपल्या वारशाने मिळालेल्या कौशल्यासह या प्रदेशातील अद्वितीय माती आणि हवामान परिस्थितीमुळे अधिक उंच आणि सडपातळ फ्लॅक्सची रोपे तयार होतात. यामुळे अतिशय उच्च दर्जाचे लिनन फॅब्रिक मिळते.
प्रत्येक वॉश आणि वापरासह हे लिनन शर्टस अधिक आरामदायी बनतात. खरंतरं यावर पडणार्या नैसर्गिक सुरकुत्या या उन्हाळ्याच्या पेहरावात आणखी भर घालते.
द २०२४ पॉझिटानो प्युअर लिनन कलेक्शन बद्दल,
या श्रेणीचे रंग इटालियन रिव्हिएरा मधील अमाल्फी कोस्टवर वसलेल्या विलक्षण शहरातील टेकड्यांपासून खाली स्फटिक निळ्या मेडिटेरिनिअन पाण्यापर्यंत पसरलेल्या बेझ,गुलाबी,पिवळा,निळा व टेराकोटा रंगाच्या घरांचे विलक्षण दृश्य प्रतिबिंबित करते.
हे सॉलिड,स्ट्राईप्स आणि चेक्सच्या विस्तृत श्रेणीत शॉर्ट व लाँग स्लिव्हज् अशा दोन्ही प्रकारात उपलब्ध असून झोडियाक लिनन जॅकेटस, ट्राउझर्स व बंद गळ्यासोबत अतिशय आकर्षक पध्दतीने जोडले जाऊ शकते.
झेडसीसीएलचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सलमान नुरानी म्हणाले की, झोडियाकच्या २०२४ पॉझिटानो कलेक्शनमधील शर्टचे रंग फ्रेंच फ्लॅक्सपासून विणलेल्या लिनन कापडांमध्ये इटालियन रिव्हिएराच्या रंगछटा दाखवितात.
झोडियाक २०२४ पॉझिटानो कलेक्शनचा प्रिव्ह्यू कसा बघावा.
झेडसीसीएल बद्दल,
झोडियाक क्लोदिंग कंपनी लि.(झेडसीसीएल) ही एक ट्रान्स नॅशनल कंपनी असून डिझाईन, उत्पादन,वितरण ते किरकोळ विक्री या कापडांची संपूर्ण साखळी नियंत्रित करते.भारतात उत्पादन सुविधा आणि भारत,युके,जर्मनी आणि युएस मध्ये विक्री कार्यालयांसह झेडसीसीएलमध्ये जवळपास २५०० लोकं कार्यरत आहेत. कंपनीच्या मुंबईच्या कॉर्पोरेट कार्यालयात सुमारे ५००० चौरस फुट इटालियन प्रेरित डिझाईन स्टुडिओ आहे,जी लीड गोल्ड प्रमाणित इमारत आहे. कंपनीने व्यवस्थापित केलेल्या १०० हून अधिक स्टोअर्स आणि १००० हून अधिक मल्टी ब्रँड रिटेलर्सच्या माध्यमातून हा ब्रँड भारतात सर्वत्र उपलब्ध आहे.