वनताराकडून महादेवी (माधुरी) साठी दयाळूपणा व विचारपूर्वक उपाययोजना
वनताराम्हणते, "कोल्हापुरातील भक्तगण, जैन मठाचे नेते आणि स्थानिक समाज यांच्या माधुरीबद्दलच्या भावना आम्ही पूर्णपणे समजून घेतो आणि त्यांचा आदर करतो."

वनतारासंस्थेने कोल्हापुरातील मंदिरातून हस्तांतरित करण्यात आलेल्या माधुरी नावाच्या (महादेवी) हत्तीणीबाबत अधिकृत निवेदन जारी केले आहे. या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की हा निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या स्पष्ट आदेशांनुसारच घेतला गेला होता. वनताराम्हणते, "कोल्हापुरातील भक्तगण, जैन मठाचे नेते आणि स्थानिक समाज यांच्या माधुरीबद्दलच्या भावना आम्ही पूर्णपणे समजून घेतो आणि त्यांचा आदर करतो." तसेच संस्थेने हेही स्पष्ट केले की, या हस्तांतरणाची कुठलीही शिफारस किंवा सुरुवात वंताराकडून करण्यात आलेली नव्हती आणि कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा कोणताही हेतू नव्हता.
या निवेदनात पुढे वंताराने सांगितले आहे की, जर जैन मठ आणि महाराष्ट्र सरकार माधुरीला परत कोल्हापुरात आणण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करतात, तर न्यायालयाच्या परवानगीअंती वनतारापूर्ण तांत्रिक व पशुवैद्यकीय सहाय्य देण्यासाठी कटिबद्ध आहे. "कोर्टाकडून मान्यता मिळाल्यानंतर, माधुरीच्या सुरक्षित आणि सन्मानपूर्वक पुनरागमनासाठी आम्ही पूर्ण सहकार्य करू."
एक सकारात्मक पुढाकार म्हणून, वंताराने कोल्हापुरातील नांदणी परिसरात माधुरीसाठी एक सॅटेलाइट पुनर्वसन केंद्र (Satellite Rehabilitation Centre) उभारण्याचा प्रस्ताव दिला आहे. हे केंद्र महाराष्ट्र शासन व जैन मठ यांच्या सहकार्याने तयार केले जाणार आहे. "ही सुविधा प्राण्यांच्या कल्याणासाठी ठरवलेल्या धोरणांनुसार, उच्चस्तरीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतर आणि मठाच्या संमतीने विकसित केली जाईल, आणि आंतरराष्ट्रीय प्राणी-देखभाल मानदंडांशी सुसंगत असेल."
या संपूर्ण निवेदनातील संवेदनशीलता, नम्रतेचा सुर, आणि प्रस्तावित पुनर्वसन योजनेमागची करुणा, याचे देशभरातून कौतुक करण्यात येत आहे. या विचारशील दृष्टिकोनाचे श्रेय अनंत अंबानी यांना दिले जात आहे, ज्यांची प्राणी कल्याण व संवर्धनासाठीची वैयक्तिक बांधिलकी ही वंताराच्या कार्यपद्धतीला आकार देत आहे. त्यांच्या नेतृत्वात वनताराही संस्था भारतात नैतिक, वैज्ञानिक आणि सहानुभूतीवर आधारित प्राणीसंवर्धनासाठीचा एक आदर्श ठरली आहे.
वनताराही संस्था कायद्याचा सन्मान करते, लोकांच्या भावना समजून घेते आणि प्राण्यांची योग्य काळजी घेण्यासाठी कायम प्रयत्नशील असते. अनंत अंबानी यांच्या मार्गदर्शनाखाली, वनताराप्रेमाने आणि जबाबदारीने प्राणीसंवर्धनाचं काम करत आहे, जिथे माणूस आणि प्राणी, दोघांचाही सन्मान राखला जातो.