स्विस मिलिटरी या ट्रॅव्हल व लाइफस्टाइल ब्रँडतर्फे अभिनव उत्पादने लाँच; भारतीय बाजारात विस्ताराच्या दिशेने आगेकूच

 मुंबई, भारत - 7 नोव्हेंबर 2024 - जागतिक पातळीवर आपल्या प्रीमियम व नावीन्यपूर्ण उत्पादनांसाठी ओळखल्या जाणाऱ्या स्विस मिलिटरी या लाइफस्टाइल ब्रँडतर्फे अहमदाबादमध्ये विस्तारीकरण करण्यासोबतच त्यांच्या ट्रॅव्हल गिअर कॅटेगरीमध्ये नव्या एसकेयूंच्या लाँचची घोषणा करण्यात आली. नव्या प्रोडक्ट लाइनमध्ये विविध रंगांमध्ये उपलब्ध असलेली उत्पादने समाविष्ट आहेत. त्यांची वैशिष्ट्यपूर्ण स्पेसिफिकेशन्स आहेत आणि उपयुक्तता व किंमत या दोन्ही पैलूंचा विचार करता या उत्पादनांनी नवे मापदंड निर्माण केले आहेत.भारतातील डायनामिक मार्केट लँडस्केप पाहता स्विस मिलिटरीने त्यांची नवीन ट्रॅव्हल गिअर उत्पादने भारतात लाँच करण्याचा निर्णय घेतला. देशातील वाढती क्रयशक्ती, स्थानिक पातळीवर वस्तुनिर्मिती करण्यास सरकारकडून दिली जाणारी चालना, ई-कॉमर्स क्षेत्राची वाढ यामुळे विस्तारीकरणासाठी या ठिकाणी निश्चितच संधी आहे. 2024 मध्ये भारतीय लगेज व बॅग्जच्या बाजारपेठेची उलाढाल 15.04 अब्ज अमेरिकन डॉलर एवढी होती. 2024 ते 2028 या कालावधीत या बाजारपेठेची वाढ सरासरी 5.21% या दराने होईल, अशी अपेक्षा आहे. यात उल्लेखनीय बाब ही की, मार्केट सेल्सपैकी 87% विक्री ही नॉन-लक्झरी प्रोडक्ट्सची असेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. स्विस मिलिटरीचे हे धोरणात्मक पाऊल भारतीय ग्राहकांच्या वाढत्या महत्त्वाकांक्षांशी आणि प्रीमियम लगेज व ट्रॅव्हल गिअरच्या वाढलेल्या मागणीशी सुसंगत आहे.स्विस मिलिटरीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. अनुज साहनी म्हणाले, "स्विस मिलिटरीने नावीन्यतेचा व विस्तारीकरणाचा प्रवास पुढे सुरू ठेवला असून आमच्या ट्रॅव्हल गिअर उत्पादनांची नवी श्रेणी लाँच केल्याचे जाहीर करताना मला अत्यंत आनंद होत आहे. उत्कृष्टता व वाजवी किमतीशी प्रतिबद्ध राहत आमच्या ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करणे नव्हे तर त्या अपेक्षांपलिकडे जाऊन समाधान देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. अतुलनीय दर्जा व उपयुक्तता उपलब्ध करून देण्याचा निर्धार हे आमचे उद्दिष्ट आहे, जेणेकरून प्रत्येक प्रवासाला उत्तम सुविधा व स्टाइल यांची साथ असेल."उत्तम दर्जाचे ट्रॅव्हल गिअर, वाजवी किमतीत प्राप्त करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना लक्ष्य करून, महासाथीनंतर, ट्रॅव्हल व लीझर ॲक्टिव्हिटींमध्ये वाढलेले स्वारस्य लक्षात घेत लगेज उत्पादनांच्या वाढलेल्या मागणीची पूर्तता करण्याचा स्विस मिलिटरीचा निर्धार आहे. विस्तारीकरणावर भर देत देशभरातील 2000हून अधिक दुकानांपर्यंत पोहोचण्यासाठी या ब्रँडने गौतम एजन्सी व अर्हम मार्केटिंगसारख्या अत्यंत विश्वासार्ह वितरकांसोबत भागीदारी केली आहे. हे वितरकांचे मुंबईतील पश्चिम व मध्य उपनगरांमध्ये नेटवर्क आहे. स्टार, एज, मेझ, कॅल्विन, कायनेटिक, क्युबॉइड, सफायर, ज्युपिटर, डॅपर, हेलियम, कुकून, डर्बी, झेटा आणि मंडला ही स्विस मिलिटरीची बेस्ट-सेलिंग मॉडेल्स असून उत्तम दर्जा व वाजवी किंमत ही त्यांची ओळख आहे. आपल्या ग्राहकांचा प्रवासाचा अनुभव अधिक सुविधाजनक व्हावा हा ब्रँडचा निर्धार असल्याचे द्योतक म्हणजे ही उत्पादने आहेत.भविष्यात गुजरात, राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश, मुंबई व दिल्ली या ठिकाणी विस्तारीकरण करण्याचा या ब्रँडचा मानस आहे. स्विस मिलिटरीच्या उत्पादनांचा देशभर प्रसार होण्यासाठी वितरण भागीदार आणि प्रमुख प्रादेशिक किरकोळ विक्रेत्यांशी सहयोग करण्यात येईल. यामुळे ग्राहकांना ही उत्पादने सहज उपलब्ध होतील."भारतीय बाजारपेठेत आपले अस्तित्व विस्तारणे हे प्रत्येक प्रांतातील ग्राहकांना सेवा देण्याच्या  आमच्या वचनबद्धतेतील महत्त्वपूर्ण पाऊल आहे. वितरण चॅनेल्स आणि मोठ्या फॉरमॅटच्या किरकोळ विक्रेत्यांशी धोरणात्मक भागीदारी करून, आमच्या प्रीमियम उत्पादनांची उपलब्धता देशभर वाढवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. आमचा मुख्य भर टियर 1 आणि टियर 2 शहरांवर आहे, जिथे आमच्या ग्राहकांच्या विविध आवडींना पूरक सेवा देण्याचे आम्ही प्रयत्न करत आहोत," असे मिस्टर साहनी म्हणाले.तीन दशकांहून अधिक कालावधीचा समृद्ध इतिहास आणि 26 देशांमध्ये उपस्थिती असलेल्या स्विस मिलिटरीने भारतातील किरकोळ बाजारपेठेत नुकत्याच झालेल्या पदार्पणानंतर वेगाने लोकप्रियता मिळवली आहे. भारतीय बाजारपेठेतील विस्तारीकरणे हे युरोपियन युनियनबाहेरील आपल्या सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक असलेल्या भारतातील ग्राहकांना सेवा देण्याच्या ब्रँडच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे.स्विस मिलिटरीबद्दल :स्विस मिलिटरी हा 30 वर्षांचा वारसा असलेला जागतिक जीवनशैली ब्रँड आहे. हा ब्रँड 26 देशांमध्ये प्रीमियम आणि नवोन्मेषपूर्ण उत्पादने देतो. 3000 पेक्षा अधिक उत्पादनांद्वारे विविध श्रेणींमध्ये त्याने जागतिक स्तरावर ग्राहकांना आकर्षित केले आहे. भारतात कार्य करताना, स्विस मिलिटरी किफायती दरात उत्पादने पुरवण्यासाठी व्यापक संशोधन करते. चेअरमन अशोक साहनी आणि व्यवस्थापकीय संचालक अनुज साहनी यांच्या नेतृत्वाखाली, स्विस मिलिटरी प्रीमियम जीवनशैली उत्पादने प्रदान करते. प्रवास साहित्य, लहान ग्राहक उपकरणे आणि कपडे यांसारख्या श्रेणींमध्ये या ब्रँडची उत्पादने उपलब्ध आहेत. गुणवत्ता, विश्वासार्हता आणि टिकाऊपणावर त्यांचा भर आहे.दिल्ली, पंजाब, जम्मू-काश्मीर, हिमाचल, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, बिहार आणि ओरिसा या राज्यांमध्ये स्विस मिलिटरीची 2000 पेक्षा अधिक विक्री केंद्रे आहेत. टियर 2 आणि टियर 3 शहरांमध्ये विस्तार होऊन, हा ब्रँड किफायती प्रीमियम उत्पादने भारतीय ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहे.

स्विस मिलिटरी या ट्रॅव्हल व लाइफस्टाइल ब्रँडतर्फे अभिनव उत्पादने लाँच; भारतीय बाजारात विस्ताराच्या दिशेने आगेकूच
स्विस मिलिटरी या ट्रॅव्हल व लाइफस्टाइल ब्रँडतर्फे अभिनव उत्पादने लाँच; भारतीय बाजारात विस्ताराच्या दिशेने आगेकूच

 

मुंबई, भारत - 7 नोव्हेंबर 2024 - जागतिक पातळीवर आपल्या प्रीमियम व नावीन्यपूर्ण उत्पादनांसाठी ओळखल्या जाणाऱ्या स्विस मिलिटरी या लाइफस्टाइल ब्रँडतर्फे अहमदाबादमध्ये विस्तारीकरण करण्यासोबतच त्यांच्या ट्रॅव्हल गिअर कॅटेगरीमध्ये नव्या एसकेयूंच्या लाँचची घोषणा करण्यात आली. नव्या प्रोडक्ट लाइनमध्ये विविध रंगांमध्ये उपलब्ध असलेली उत्पादने समाविष्ट आहेत. त्यांची वैशिष्ट्यपूर्ण स्पेसिफिकेशन्स आहेत आणि उपयुक्तता व किंमत या दोन्ही पैलूंचा विचार करता या उत्पादनांनी नवे मापदंड निर्माण केले आहेत.

भारतातील डायनामिक मार्केट लँडस्केप पाहता स्विस मिलिटरीने त्यांची नवीन ट्रॅव्हल गिअर उत्पादने भारतात लाँच करण्याचा निर्णय घेतला. देशातील वाढती क्रयशक्ती, स्थानिक पातळीवर वस्तुनिर्मिती करण्यास सरकारकडून दिली जाणारी चालना, ई-कॉमर्स क्षेत्राची वाढ यामुळे विस्तारीकरणासाठी या ठिकाणी निश्चितच संधी आहे. 2024 मध्ये भारतीय लगेज व बॅग्जच्या बाजारपेठेची उलाढाल 15.04 अब्ज अमेरिकन डॉलर एवढी होती. 2024 ते 2028 या कालावधीत या बाजारपेठेची वाढ सरासरी 5.21% या दराने होईल, अशी अपेक्षा आहे. यात उल्लेखनीय बाब ही की, मार्केट सेल्सपैकी 87% विक्री ही नॉन-लक्झरी प्रोडक्ट्सची असेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. स्विस मिलिटरीचे हे धोरणात्मक पाऊल भारतीय ग्राहकांच्या वाढत्या महत्त्वाकांक्षांशी आणि प्रीमियम लगेज व ट्रॅव्हल गिअरच्या वाढलेल्या मागणीशी सुसंगत आहे.

स्विस मिलिटरीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. अनुज साहनी म्हणाले, "स्विस मिलिटरीने नावीन्यतेचा व विस्तारीकरणाचा प्रवास पुढे सुरू ठेवला असून आमच्या ट्रॅव्हल गिअर उत्पादनांची नवी श्रेणी लाँच केल्याचे जाहीर करताना मला अत्यंत आनंद होत आहे. उत्कृष्टता व वाजवी किमतीशी प्रतिबद्ध राहत आमच्या ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करणे नव्हे तर त्या अपेक्षांपलिकडे जाऊन समाधान देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. अतुलनीय दर्जा व उपयुक्तता उपलब्ध करून देण्याचा निर्धार हे आमचे उद्दिष्ट आहे, जेणेकरून प्रत्येक प्रवासाला उत्तम सुविधा व स्टाइल यांची साथ असेल."

उत्तम दर्जाचे ट्रॅव्हल गिअर, वाजवी किमतीत प्राप्त करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना लक्ष्य करून, महासाथीनंतर, ट्रॅव्हल व लीझर ॲक्टिव्हिटींमध्ये वाढलेले स्वारस्य लक्षात घेत लगेज उत्पादनांच्या वाढलेल्या मागणीची पूर्तता करण्याचा स्विस मिलिटरीचा निर्धार आहे. विस्तारीकरणावर भर देत देशभरातील 2000हून अधिक दुकानांपर्यंत पोहोचण्यासाठी या ब्रँडने गौतम एजन्सी व अर्हम मार्केटिंगसारख्या अत्यंत विश्वासार्ह वितरकांसोबत भागीदारी केली आहे. हे वितरकांचे मुंबईतील पश्चिम व मध्य उपनगरांमध्ये नेटवर्क आहे. स्टार, एज, मेझ, कॅल्विन, कायनेटिक, क्युबॉइड, सफायर, ज्युपिटर, डॅपर, हेलियम, कुकून, डर्बी, झेटा आणि मंडला ही स्विस मिलिटरीची बेस्ट-सेलिंग मॉडेल्स असून उत्तम दर्जा व वाजवी किंमत ही त्यांची ओळख आहे. आपल्या ग्राहकांचा प्रवासाचा अनुभव अधिक सुविधाजनक व्हावा हा ब्रँडचा निर्धार असल्याचे द्योतक म्हणजे ही उत्पादने आहेत.

भविष्यात गुजरात, राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश, मुंबई व दिल्ली या ठिकाणी विस्तारीकरण करण्याचा या ब्रँडचा मानस आहे. स्विस मिलिटरीच्या उत्पादनांचा देशभर प्रसार होण्यासाठी वितरण भागीदार आणि प्रमुख प्रादेशिक किरकोळ विक्रेत्यांशी सहयोग करण्यात येईल. यामुळे ग्राहकांना ही उत्पादने सहज उपलब्ध होतील.

"भारतीय बाजारपेठेत आपले अस्तित्व विस्तारणे हे प्रत्येक प्रांतातील ग्राहकांना सेवा देण्याच्या  आमच्या वचनबद्धतेतील महत्त्वपूर्ण पाऊल आहे. वितरण चॅनेल्स आणि मोठ्या फॉरमॅटच्या किरकोळ विक्रेत्यांशी धोरणात्मक भागीदारी करून, आमच्या प्रीमियम उत्पादनांची उपलब्धता देशभर वाढवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. आमचा मुख्य भर टियर 1 आणि टियर 2 शहरांवर आहे, जिथे आमच्या ग्राहकांच्या विविध आवडींना पूरक सेवा देण्याचे आम्ही प्रयत्न करत आहोत," असे मिस्टर साहनी म्हणाले.

तीन दशकांहून अधिक कालावधीचा समृद्ध इतिहास आणि 26 देशांमध्ये उपस्थिती असलेल्या स्विस मिलिटरीने भारतातील किरकोळ बाजारपेठेत नुकत्याच झालेल्या पदार्पणानंतर वेगाने लोकप्रियता मिळवली आहे. भारतीय बाजारपेठेतील विस्तारीकरणे हे युरोपियन युनियनबाहेरील आपल्या सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक असलेल्या भारतातील ग्राहकांना सेवा देण्याच्या ब्रँडच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे.

स्विस मिलिटरीबद्दल :

स्विस मिलिटरी हा 30 वर्षांचा वारसा असलेला जागतिक जीवनशैली ब्रँड आहे. हा ब्रँड 26 देशांमध्ये प्रीमियम आणि नवोन्मेषपूर्ण उत्पादने देतो. 3000 पेक्षा अधिक उत्पादनांद्वारे विविध श्रेणींमध्ये त्याने जागतिक स्तरावर ग्राहकांना आकर्षित केले आहे. भारतात कार्य करताना, स्विस मिलिटरी किफायती दरात उत्पादने पुरवण्यासाठी व्यापक संशोधन करते. चेअरमन अशोक साहनी आणि व्यवस्थापकीय संचालक अनुज साहनी यांच्या नेतृत्वाखाली, स्विस मिलिटरी प्रीमियम जीवनशैली उत्पादने प्रदान करते. प्रवास साहित्य, लहान ग्राहक उपकरणे आणि कपडे यांसारख्या श्रेणींमध्ये या ब्रँडची उत्पादने उपलब्ध आहेत. गुणवत्ता, विश्वासार्हता आणि टिकाऊपणावर त्यांचा भर आहे.

दिल्ली, पंजाब, जम्मू-काश्मीर, हिमाचल, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, बिहार आणि ओरिसा या राज्यांमध्ये स्विस मिलिटरीची 2000 पेक्षा अधिक विक्री केंद्रे आहेत. टियर 2 आणि टियर 3 शहरांमध्ये विस्तार होऊन, हा ब्रँड किफायती प्रीमियम उत्पादने भारतीय ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहे.